सिनेसृष्टी असोसिएशनतर्फे ज्युनिअर कामगार कलाकारांच्या हक्कांसाठी आमरण उपोषण

सिनेसृष्टी असोसिएशन

मुंबई (उपसंपादक सुरेश पटनाईक) : सिनेसृष्टी असोसिएशनतर्फे ज्युनिअर कामगार कलाकारांच्या यांचा हक्कासाठी १५ जुलै२०२५ रोजी आझाद मैदान येथे सकाळी १०. ०० वा. पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

आपल्या मागण्या मांडण्याकरिता ११ मार्च रोजी ज्युनिअर कामगार व कलाकारांनी आझाद मैदान येथे आमरण उपोषण केले होते. यावेळी सांस्कृतिक मंत्री श्री शेलार यांनी विधानभवन येथे तातडीची बैठक घेतली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी मागण्या पूर्तीबद्दल लवकरच मीटिंग घेतो असे आश्वासन दिलं होतं. परंतु एक वर्षापासून पाठपुरावा करुनही या मागण्यांचे आजपर्यंत काहीच झालं नाही.
सरकारी अधिकारी या कलावंत व कामगारांबरोबर फक्त पत्रव्यवहार करीत आहेत. आज बैठक लावतो उद्या लावतो असे सांगून फसवणूक करीत आहेत. म्हणून आता या फसव्या सरकारला आणि अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मंगळवार दिनांक १५ जुलै २०२५ रोजी आमरण उपोषण करीत असल्याबाबतचे कायदेशीर पत्र सिनेसृष्टी असोसिएशनने आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here