गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त कर्नाटक येथील साईभक्त प्रकाश यांचा आकर्षक सजावटीबद्दल सत्कार

साईभक्त प्रकाश

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त कर्नाटक राज्यातील गौरीबिदनोर जिल्ह्यातील साईभक्त सुब्बारेड्डी प्रकाश यांनी साई समाधी मंदिर गुरुस्थान चावडी द्वारकामाई व ग्रामदैवत असलेल्या मंदिरावर आकर्षक व मनमोहक फुलांची सजावट केली होती गेली दहा वर्षांपासून साईभक्त प्रकाश शिर्डीत साईमंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करत आहे

या संदर्भात साईभक्त सुब्बारेड्डी प्रकाश यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली यावेळी शिर्डी शहरातील ज्येष्ठ नेते रमेशभाऊ गोंदकर व अशोकराव कोते पाटील व दिपकराव गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते साई मंदिर फुल सजावट केल्याबद्दल ग्रामस्थ गोंदकर व कोते पाटील यांनी सुब्बारेड्डी प्रकाश यांचा सत्कार केला सत्कारानंतर प्रकाश यांनी सांगितले की मी 2007 पासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतोय साई मंदिरात व परिसरात फुलांची सजावट करण्याची निःशुल्क सेवा मला मिळावी अशी प्रार्थना मी साईबाबांकडे 2007 मध्ये केली होती ती 2015 साली साईबाबांनी पूर्ण केली मला या प्रार्थनेचा कृपाशीर्वाद दिला व दरवर्षी एकादशीला मला मंदिरात व परिसरात फुलांची सजावट करण्याची सेवा व संधी साईबाबांनी दिली साईबाबांचे मंदिर व परिसर फुलांनी सजविण्याची मनस्वी इच्छा पूर्ण झाली या फुल सजावटी करिता शिर्डी येथील ग्रामस्थ गजानन शेर्वेकर रमेशभाऊ गोंदकर व अशोकराव कोते पाटील यांची खूप साथ व सहकार्य लाभले साईबाबा संस्थान प्रशासन व विश्वस्त मंडळाचे सुद्धा यासाठी अनमोल सहकार्य मिळाले
दरवर्षी एकादशीला ही संधी मिळायची यावर्षी गुरुपौर्णिमेला सुद्धा मिळाली साईबाबांचा हा मोठा कृपाशिर्वाद प्राप्त झाला आहे यावेळी प्रकाश यांनी सांगितले गुरुपौर्णिमेनिमित्त सजावटीसाठी वीस प्रजातीचे फुल होती यामध्ये काही परदेशी फुलांचा सुद्धा समावेश आहे सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या फुलांमध्ये गुलाबाची बुके त्याचबरोबर इतर आकर्षक फुलांचा समावेश होता जवळपास एकूण तीस हजार फुले सजावटीसाठी लागले त्याचबरोबर 55 भाविकांनी मिळून तीन दिवस व रात्री काही वेळ काम करून ही सजावट केली होती सुब्बारेड्डी प्रकाश यांनी वनी येथील सप्तशृंगी मंदिरातही फुलांची सजावट केलेली आहे सुब्बारेड्डी प्रकाश निस्सीम साईभक्त आहेत कुठलाही एक रुपया न घेता ते साई मंदिरात व परिसरात एकादशीला निशुल्कपणे सेवाभावी वृत्तीने आकर्षक व मनमोहक फुलांची सजावट करून साई भक्तांना नवा आनंद देत असतात
साईबाबा संस्थान प्रशासन त्यांना योग्य सहकार्य करत असल्याने त्यांची साईबाबा प्रती असलेली सदिच्छा व फुल सजावटीचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सुब्बा रेड्डी प्रकाश प्रतिक्रिया देताना सांगितले साईबाबा संस्थान प्रशासन तसेच पूर्वीचे विश्वस्त मंडळ यांचे खूप मोठे सहकार्य मिळाले त्याचबरोबर शिर्डी येथील माजी नगरसेवक गजानन शेर्वेकर तसेच ज्येष्ठ नेते अशोकराव कोते पाटील व रमेशभाऊ गोंदकर या ग्रामस्थांची नेहमी मोठी मदत व साथ असते त्यामुळे साईबाबा मंदिर व परिसराची आकर्षक फुलांनी सजावट करणे मला शक्य होत आहे या कामी साईबाबांचे आशीर्वाद माझ्यावर सदैव असेच राहो अशी प्रार्थना साईचरणी प्रकाश यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here