भडगाव (तालुका क्राईम रिपोर्टर अमीन पिंजारी) : तालुक्यातील कजगाव येथून चाळीसगाव येथे कजगाव परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी चाळीसगाव येथे जात असताना मात्र एसटी महामंडळाचे चालक व कंडक्टरांकडून शालेय मुलांना बजावून सांगण्यात येते की पास चालणार नाही गाडीत बसू नका वारंवार विद्यार्थ्यांना वाहक आणि कंडक्टर कडून सांगण्यात येते, तसेच वयोवृद्ध लोकांना देखील दमदाटी करत असतात असे प्रकार कजगाव बस स्टॅन्ड येथे वारंवार घडत असल्याने नागरिकांनी कडून नाराजी व्यक्त केली जात आहे,
एसटी बस ही प्रवासी उतरवण्यासाठी कजगाव बस स्टँड च्या मध्यभागी थांबवत असल्याने येथे नेहमी ट्राफिक जाम झालेली असते, मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असतो इमर्जन्सी रुग्णवाहिकांना देखील जाण्यासाठी जागा राहत नाही असे अनेक प्रकार कजगाव बस स्टॅन्ड येथे सतत होत असतात, अनेक वेळा कजगाव बस स्टँड येथे विद्यार्थी व वयोवृद्ध वाहक चालकांचा वाद होतो कजगाव चे नागरिक मध्यस्थी करून वाद मिटवत असतात, एस,टी , बस व चालक व कंडक्टर कडून प्रवाशांना योग्य वागणूक दिली जात नाही , बस मध्ये प्रवेश देण्याऐवजी दमदाटी करण्यासारखे प्रकार सतत घडत असतात.
विशेष विद्यार्थ्यांना आणि वृद्ध नागरिकांना या त्रासाचा अधिक सामना करावा लागत असतो, वृद्ध नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवासा केवळ प्रवास नसून त्यांच्यासाठी वेळेवर पोहोचण्याची गरज आहे पण एसटी महामंडळाच्या वाहक व चालकांकडून शालेय विद्यार्थ्यांना दिलेली वागणूक आचार्य कारक आहे, बस चालक व कंडक्टर यांचा मनमानी कारभार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन थांबवण्यात यावा, जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांचे याच्यामुळे शैक्षणिक नुकसान होणार नाही , यामुळे शिक्षण घेण्यासाठी चाळीसगावला जाणारे विद्यार्थिनींना मानसिक त्रास सहन करावा लागनार नाही त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांकडून व कजगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.







