कोल्हापूर (प्रतिनिधी सतिश चव्हाण) : महाराष्ट्रातील महानगरपालिका एकुण स्व उत्पन्नाच्या ५% निधी दिव्यांग बांधवांना खर्च करते तरी इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासुन ५ % निधी शासन निर्णयाला डावलून अल्प प्रमाणात दिला जातो. तसेच 30 सप्टेंबर 2022 च्या जीआर नुसार महानगरपालिका उत्पन्नातून पाच टक्के रक्कम ही दिव्यांगाना देणे लागत असून आपल्या महानगरपालिकेकडून बांधील खर्च वजा करून त्यातून पाच टक्के रक्कम दिले जाते जी शासन निर्णयाच्या विरोधात असून 2024/25 या सालाकरिता आपल्या महानगरपालिकेकडे जवळपास एक अब्ज 93 कोटी रुपये उत्पन्न जमा झाले असल्याचे दिसून येत आहे.
त्या अनुषंगाने आपण आपल्या महानगरपालिका कार्यालयाकडे नोंद असलेल्या दिव्यांगांसाठी किमान नऊ कोटी रुपये देणे लागत असून आपल्या कार्यालयातून फक्त 35 लाखाच्या आसपास निधी दिला जाईल असे कळविण्यात आलेले आहे जे शासन निर्णयाच्या विरोधात असून आपल्या कार्यालयाकडून त्याचा खुलासा होण्यात यावा व बांधील खर्च वजा करून दिव्यांगाना पाच टक्के निधी देण्याबाबत आपणाकडे जर कोणता जीआर असेल तर तो जी आर आम्हाला दाखवण्यात यावा. त्याचबरोबर 2024/25 सालचा दिव्यांग निधी ही आजपर्यंत देण्यात आलेला नाही.
सदर दिव्यांगांचा पाच टक्के निधी हा जुलै महिना अखेरपर्यंत दिव्यांगांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा अन्यथा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट पासून महानगरपालिका कार्यालय इचलकरंजी समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल तरी आपण आमच्या अर्जाचा लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अन्यथा होणाऱ्या परिणामास इंचलकरंजी महानगरपालिका जबाबदार राहील याची नोंद व्हावी.
निवेदन देते वेळी उपजिल्हाअध्यक्ष (उ वि,) सुनिल पाटील श,अध्यक्ष अनिल विजयनगरे,प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाकार्याध्यक्ष विकास गायकवाड,जि,सपर्कप्रमुख दादासो सुतार उपअध्यक्ष इरफान बागवान,महिला अध्यक्षा अंजना नेतले,खजानिस संतोष यलगार विजय घोटणे दत्ता मांजरे रोहित नलवडे उपस्थीत होते.







