विद्याधर अनासकर यांच्या गोष्ट रिझर्व्ह बँकेची या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रकाशन

गोष्ट रिझर्व्ह बँकेची

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : सहकारी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर यांनी लिहिलेल्या रिझर्व्ह बँकेच्या ठराविक कालखंडातील घडामोडी व अभ्यासावर आधारित गोष्ट रिझर्व्ह बँकेची या संदर्भ ग्रंथांची निर्मिती केली आहे

मंत्रीमंडळाच्या विधिमंडळाच्या सभाग्रुहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात गोष्ट रिझर्व्ह बँकेची या संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला, अंत्यंत ओघवत्या शैलित व रंजक शब्दात ५१ प्रकरणाद्धारे सदर पुस्तकाची निर्मिती केली आहे, सदर पुस्तकाचं प्रकाशन सोमवारी मंत्रालय विधिमंडळाच्या सभाग्रुहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, क्रुषी मंत्री माणीकराव कोकाटे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अतुल सावे, पंकजा मुंडे, नितेश राणे, पंकज भोइर,अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, यांच्या उपस्थितित रिझर्व्ह बँकेचे प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी दि,१४ जूलै रोजी प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुस्तकातील विविध प्रकरणांचा धावता आढावाही घेतला,, भविष्यात रिझर्व्ह बँकेचा संपूर्ण इतिहास ( कालखंड) अधोरेखित करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी लेखक विद्याधर अनासकर यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी शिखर बँकेच्या मुख्य प्रशासकाच्या कामगिरीचेही मान्यवरांनी कौतुक केले आहे, नुकतेच नाशिक जिल्हा बँकेच्या सल्लागार प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, रिझर्व्ह बँक, शिखर बँक, या बरोबर नाशिक जिल्हा बँकेचे बिघडलेलं आर्थिक आरोग्यही सुधारण्यासाठी नक्कीच मदत होनार असल्याचे सहकार क्षेत्रातील जाणकार कुबेर जाधव यांनी म्हटले आहे, राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले असुन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांनी प्रस्तावना दिली आहे,*सहकार क्षेत्रातील अभ्यासकांसाठी गोष्ट रिझर्व्ह बँकेची हा संदर्भ ग्रंथ नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here