कसमादे भागात युरियाचा तुटवडा; शेतकरी मेटाकुटीला

युरिया

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : सध्या खरीप हंगामातील पीकाचा हंगाम जोमात आहे, यावर्षी पाऊस चांगला झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात रासायनिक खंते खाद्य उपलब्ध करून दिली पाहिजे परंतु नाशिक जिल्ह्यातील विशेषतः कसमादे मध्ये बहुतांश विशेषतः देवळा, बागलाण तालुक्यातील फर्टिलायझर कंपन्यांकडे गेल्या ८,/१० दिवसांपासून युरीया शिल्लक नाही, असे सांगून गरजु शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे,

सर्वत्र युरीयाचा तुटवडा निर्माण झाला आहे, सदरच्या तुटवड्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात मेटाकुटीला आला आहे, महाराष्ट्र शासन व संबंधित आर सी एफ कंपनीने तात्काळ देवळा, बागलाण मालेगाव, कळवण तालुक्यासाठी पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच त्यासाठी कुठल्याही प्रकारची इतर खंताची व औषधांची सक्ती ( लिंकिंग)करु नये असे आवाहनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केले आहे, तसे आढळून आल्यास तात्काळ तालुका कृषी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिकचे समन्वयक कुबेर जाधव यांनी निवेदनात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here