नाट्यरसिक मंचच्या कार्याध्यक्षपदी रमेशभाऊ गोंदकर यांची निवड

नाट्यरसिक मंच

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : साता समुद्रापार महती पोहचलेल्या श्री साईबाबांच्या सत्चरित्र पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवलेल्या शिर्डी शहरातील नाट्य रसिक मंचच्या कार्याध्यक्षपदी शिर्डी शहरातील धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जेष्ठ नेते रमेशभाऊ गोंदकर यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती नाट्य रसिक मंचाचे अध्यक्ष अशोक नागरे सचिव अशोक खंडू कोते व कार्यकारी सदस्य प्रकाश गायके यांनी दिली.

दरम्यान श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या प्रसार आणि प्रचार कार्यात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या शिर्डी शहरातील नाट्य रसिक मंच च्या सर्व सदस्यांचा खारीचा वाटा आहे. सन १९९४ साली नाट्य रसिक मंच यांच्या पुढाकारातून जगप्रसिध्द श्री साई मंदिर परीसरातील दिक्षित वाड्याजवळ साई चरित्र पारायण सोहळा सुरु करण्यात आला.पाहिल्या वर्षी फक्त ७५ भाविक पारायण सोहळ्यास बसले होते.आज या वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्यांनी सुरु केलेल्या पारायण सोहळ्यास यंदा ३० वर्ष पूर्ण झाले आहे.
यंदाचे हे ३१ वे वर्ष असल्याने हा सोहळा दैदिप्यमान करण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, नाट्य रसिक मंच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांची जोरदार तयारी सुरु असून शुक्रवार दिनांक 25/ 7/ 2025 ते 2/8/25 पर्यंत हा सोहळा होणार आहे आजरोजी या सोहळ्यात देश विदेशातील सात ते आठ हजार भाविकांची लक्षणीय सहभाग असतो.यामध्ये महिला भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. नाट्य रसिक मंच चे अध्यक्ष अशोक नागरे यांनी रमेशभाऊ गोंदकर यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविल्याने यंदाचा साई सत्चारित्र पारायण सोहळा आनंददायी होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शांताराम मिराने,अप्पासाहेब कोते, अध्यक्ष अशोक नागरे, सचिव अशोक kote गणपत गोंदकर भाऊसाहेब साबळे कार्यकारी सदस्य प्रकाश गायके सभाष घुगे, अशोक नलू शेठ सारंगधर, रामदास बरदे,प्रल्हाद वाणी,अशोक जगताप,,नितीन मिराने,श्रीमती सुमनबाई गोंदकर,श्रीमती रजनी जोगळेकर,सौ चित्रा इंगळे यांनी या निवडीचे स्वागत केले. या साई सच्चरित्र पारायण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा इच्छुकांनी नोंदणी करावी असे आव्हान नाट्य रसिक मंचाच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here