सातारा (प्रतिनिधी लव चव्हाण) : येथे ५०० रुपयांचे आमिष दाखवत १२ वर्षीय मुलीला आरोपी घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात ही घटना उघडकीस आली. एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी बलात्कार केला. लालासो यशवंत पवार (वय ५५ वर्षे) आणि विकास जाधव उर्फ इब्र्या (वय २५ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून घेतला असून या दोन्ही आरोपींची नावे मुलीने सांगितल्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी रहिमतपूर पोलिसांनी आरोपींविरोधात कलम ७५,७६,७८,६४,६४ (२),६५ (१), ३५ (२), ४, ६, ८, १० आणि १२ अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत.







