भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; १७ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

दुचाकीला धडक

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : सटाणा-मालेगाव रस्त्यावर भरधाव ट्रकने स्कूटीला धडक दिली. या अपघातामध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिचा भाऊ जखमी झाला. या अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सटाणा-मालेगाव रस्त्यावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक आणि स्कूटी यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातामध्ये स्कूटीवरून जाणाऱ्या मोक्षदा जगदीश बधान (वय १७ वर्षे) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिचा भाऊ जखमी झाला. ही विद्यार्थिनी अजमीर सौंदाणे येथे राहत होती.
मोक्षदा ही सटाण्याहून क्लास करुन आजमेर सौदाणे येथे आपल्या भावासोबत स्कूटीवरून घरी जात होती त्यावेळी ही भयंकर घटना घडली. तिच्या स्कूटीला भरधाव ट्रकने धडक दिली. ट्रकच्या धडकेत मोक्षदा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा भाऊ कृष्णा याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here