महाराष्ट्र वकील संरक्षण कायद्यास मंजुरी द्यावी; आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वकील संरक्षण

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : महाराष्ट्रात वकील संरक्षण कायद्यास मंजुरी मिळावी या मागणीसाठी पंढरपूर न्यायालया बाहेर बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. या घटनेची दखल घेत पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात उपस्थित असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील वकील बांधवांच्या विविध समस्या मांडत महाराष्ट्र वकील संरक्षण कायद्यास मंजुरी देण्याची मागणी निवेदन द्वारे केली.

महाराष्ट्रात सुमारे दोन लाख वकील बांधव व बहिणी बार असोसिएशन कौन्सिलंच्या माध्यमातून कार्यरत आहेत. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात तसेच त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली जाते. या मागण्या पूर्ण झाल्यास त्यांच्यावर सातत्याने जीव घेणे हल्ले होत असतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालण्याची गरज आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये वकील संरक्षण कायदा पारित करण्यात आला असून या कायद्याच्या माध्यमातून वकिलांना संरक्षण देण्यात आले आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य व गोवा राज्यात वकील संरक्षण कायदा मंजूर करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करत आमदार समाधान आवताडे यांनी हॉटेल संरक्षण कायदा मंजूर करावा अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here