सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : येथील नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ.महेश गुरव यांची केंद्र शासनाच्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीवर सदस्यपदी निवड झाली आहे.
डॉ.गुरव हे खासदार श्रीमंत छत्रपती उद्यनराजे भोसले यांचे विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. केंद्र शासनाच्या भारतीय खाद्य निगमचे संचालक म्हणूनही त्यांनी पाच वर्षे काम पाहिले आहे. गेली तीस वर्षे ते समाजकारण, राजकारणात सक्रीय आहेत. डॉ. गुरव यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.







