बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : मराठा व बहुजन समाजातील युवकांना शिवशाही, शाहू, फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रगत विचारसरणी देत उद्योजकतेकडे वळवणारे, तसेच समाज परिवर्तनासाठी कार्यरत असलेले शिवश्री प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दीपक काटे व काही समाजकंटकांकडून शाहीफेक व जिवघेणा हल्ला करण्यात आला. या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज नांदुरा येथे शिवप्रेमी, संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटनांच्या वतीने तहसीलदार कार्यालय, नांदुरा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, प्रवीणदादा गायकवाड यांना शासनामार्फत तात्काळ सुरक्षा पुरवावी., समाजात द्वेष पसरवणाऱ्या व अशांती निर्माण करणाऱ्या अशा समाजकंटकांवर तात्काळ आळा घालण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना अमलात आणाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदन सादर करताना शिवश्री शरद पाटील (जिल्हा उपाध्यक्ष, मराठा सेवा संघ), शिवश्री भगवान सोयस्कर सर (तालुकाध्यक्ष, मराठा सेवा संघ),शिवश्री आनंद मुंडे (शहराध्यक्ष, मराठा सेवा संघ नांदुरा), शिवश्री अशोकराव धनोकार (जिजाऊ सावित्री विचार मंच), शिवश्री छोटू पाटील (जिल्हाध्यक्ष, मराठा पाटील युवक समिती), शिवश्री अमर पाटील (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), शिवश्री श्रीकृष्ण वडोदे (तालुका अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड खामगाव), शिवश्री दिलीप कोल्हे (तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड नांदुरा), शिवश्री रोशन चोपडे (ता. सचिव, संभाजी ब्रिगेड नांदुरा), तसेच संजय पाटील, प्रशांतभाऊ पेटकर, धम्मपाल वाघमारे, श्रीकांत पाटील, अनिल बावस्कर, विनोद वनारे, अतुल गव्हाड, दीपक ढोले, वैभव पारस्कर (सर्कल प्रमुख, निमगाव), गणेश धामोडकर (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), पद्माकर ढोले (तालुका कार्याध्यक्ष, शेतकरी कन्यापुत्र), भूषण धामोडकर (सामाजिक कार्यकर्ते) आदी मान्यवरांसह अनेक शिवप्रेमी व समविचारी कार्यकर्ते उपस्थित होते.या निवेदनाच्या माध्यमातून समाजात शांतता आणि कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.







