भरधाव वेगाने येणा-या डिझायर गाडीने दिली बैलगाडीला जोरदार धडक

धडक

भडगाव (तालुका क्राईम रिपोर्टर अमीन पिंजारी) : भडगाव कजगाव रस्त्यावर कोठली फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डिझायर कारने क्रमांक (MH 02 BR 1601) बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या धडकेत बैलगाडीचा चक्काचूर झाला असून शेतकरी आणि बैल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.१८) दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

कोठली येथील शेतकरी विजय पाटील शेतीचे काम आपटून बैलगाडीने घरी परतत असताना ही दुर्घटना घडली, अपघातात दोन्ही बैलांच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून विजय पाटील यांना ही गंभीर इजा झाली आहे, घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले , बैलांना प्राथमिक उपचार घटनास्थळीच देण्यात आले, अपघाताची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here