बांगलादेशाच्या हवाई दलाचं एफ ७ शाळेच्या इमारतीवर विमान कोसळलं

एफ ७

ढाका (वृत्तसंस्था) : बांगलादेश हवाई दलाचे एक एफ ७ प्रशिक्षण विमान आज दुपारी १.३० वाजता राजधानी ढाक्यातील उत्तरा भागातील दियाबारी भागात कोसळले. हे विमान माइलस्टोन कॉलेजच्या उत्तरा कॅम्पसजवळ कोसळले. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे.

या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. तर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे परिसरात घबराट पसरली आहे. बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारने इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स डायरेक्टरेटच्या हवाल्याने म्हटले आहे की, जेटच्या अपघातामुळे शाळेच्या कॅम्पसचे मोठे नुकसान झाले आहे.

https://twitter.com/Dig_raw21/status/1947213405615423716

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जळत्या ढिगाऱ्याचे आणि जखमींचे फोटो दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अपघातानंतर सर्वत्र धूर आणि ओरड सुरू होती. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मृतांचा नेमका आकडा अद्याप कळू शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here