मुंबई (वृत्तसंस्था) : सोमवारी सकाळी कोचीहून मुंबई विमानतळावर उतरताना एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. तपासणीसाठी विमानाला ग्राउंड करण्यात आले आहे.
विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी तसेच क्रू मेंबर्स उतरले आहेत. विमान A1- 2744 फ्लाइट नंबर कोचीहून मुंबईला खाली उतरत असताना ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
Air India plane from Kochi overshoots runway while landing at Mumbai airport on Monday morning: Sources. pic.twitter.com/HKSyt0YksX
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2025
प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगदरम्यान विमान रनवेवरून पुढे गेले, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. विमानातील प्रवासी आणि क्रू सर्व सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर मुंबई विमानतळावरील काही वेळासाठी उड्डाण आणि लँडिंगच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. विमान का घसरले, याचा तपास सुरू असून हवामानाच्या स्थितीचाही अभ्यास केला जात आहे अशी माहिती विमान प्राधिकरण कडून देण्यात आली आहे.







