१ कोटी ६९ लाख २६ हजार किंमतीचा एमडी अंमली पदार्थाचा साठा जप्त

अंमली पदार्थाचा साठा

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थाची विक्री, साठा तसेच अंमली पदार्थाचे सेवन करणारे यांचेवर सक्त कारवाई करण्याबाबत तसेच तरुण पिढीला नशामुक्त करणेसाठी मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी सर्व पोलीस अधिकारी यांना आदेश निर्गमित केले होते, त्याअनुषंगाने गुन्हे शाखेकडुन अशा प्रकारचे अंमली पदार्थाची विक्री, साठा व सेवन करणारे यांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रीया चालु करण्यात आली होती. त्यात गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे यांना यश प्राप्त झाले आहे.

दि. १८ जुलै २०२५ रोजी गोपनीय सुत्रांनुसार प्राप्त झालेल्या माहितीचे आधारे मुंब्रा बायपास उड्‌डाणपुल लगत, मुंब्रा येथे गुन्हे शाखा, घटक १, ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रचलेल्या सापळ्यामध्ये इसम नामे मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा हा त्याच्या ताब्यातील मारूती SX4 कार क्र. MH-48-A-3126 मधुन संशयास्पदरित्या जात असताना त्यास ताब्यात घेवुन त्याचे कारची झडती घेतली असता, त्यामध्ये १,६९,२६,०००/-रु किमतीचा १ किलो २०९ ग्रॅम वजनाचा एमडी (MD) याअंमली पदार्थाचा साठा मिळुन आला आहे. त्याबाबत मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १२४४/२०२५ एन.डी.पी.एस कायदा कलम १९८५ चे कलम कलम ८ (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन, नमुद गुन्हयात आरोपी नामे मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा वय ५५ वर्ष, राहणार- २०२, प्रगती नगर, ०१ ला मजला, कुडूस, ता.वाडा, जि. पालघर यास अटक करण्यात आलेली आहे. नमुद आरोपीत याचे साथीदार तसेच त्याने सदरचा माल कोठुन व कसा आणला याबाबत सविस्तर तपास चालु आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमरसिंह जाधव, सहा. पोलीस आयुक्त, शोध १, गुन्हे शाखा, शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उप निरीक्षक प्रकाश शिरसाठ, सहा. पोलीस उप निरीक्षक दयानंद नाईक, दिपक जाधव, भरत आरवंदेकर, पोहवा/नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, शशीकांत सावंत, महिला पोलीस नाईक तेजश्री शेळके, पोलीस शिपाई/मयुर लोखंडे, सागर सुरळकर, सर्व नेम. गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे यांच्या पथकाने केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here