गुजरात एटीएसने अल-कायदाशी संबंधित ४ दहशतवाद्यांना केले जेरबंद

अल-कायदा

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक्यूआयएस (भारतीय उपखंडातील अल-कायदा) शी संबंधित चार कथित दहशतवाद्यांना अटक केली आहे, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.

 

वृत्तानुसार, अहमदाबादमधून २, दिल्लीतून एक आणि नोएडामधून एक दहशतवाद्याला आज, २३ जुलै रोजी अटक करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या मोहम्मद फैक, मोहम्मद फरदीन, सेफुल्ला कुरेशी, झिशान अली यांच्यावरील या कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल, असे एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here