नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : येथील ओबीसी मुलींच्या वसतिगृहात शिरुन विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार सरकारी वसतीगृहात घडला आहे. आरोपी दाराची कडी काढून आत शिरले अन् तरूणीवर अत्याचार केला. सरकारी वस्तीगृहात सीसीटीव्ही नाहीत, त्याशिवाय पुरेसी सुरक्षाही नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
नागपूरमधील सरकारी मुलींच्या हॉस्टेलमध्ये मंगळवारी (दि.२२) आरोपी घुसले. ते कडी काढून एका मुलीच्या खोली शिरले अन् विनयभंग केला. त्यानतर मुलीचा मोबाईल घेऊन पसार झाले. या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या सरकारी हॉस्टेलमध्ये ६४ तरूणी राहातात.
तरूणीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींना शोधण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही नसल्याने, अद्याप आरोपीला बेड्या ठोकण्यात अपयश आले आहे.







