पुणे-नाशिक महामार्गावरील पेठजवळ टेम्पो पलटी

accident
file photo

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ गावाच्या हद्दीत गुरुवार, २४ जुलै रोजी रात्री छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात त्यामधील १० भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान या अपघातास पाठीमागून आलेल्या इंडिका कारने टेम्पोला अचानक कट मारणे हे कारण असल्याचे चालक शरद वामन गायकवाड (रा. मालेगाव, जि. नाशिक) यांनी सांगितले. जखमी भाविकांना अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने इतर वाहनांद्वारे मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल टाके यांनी दिली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेली इंडिका कार थांबली नाही आणि चालक पळून गेला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here