माऊली स्कॉडची दमदार कामगिरी; १५६ संशयित ताब्यात २१ आरोपींना अटक

माऊली स्कॉड

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : आषाढी वारी २०२५ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने माऊली स्कॉड ही कल्पक संकल्पना यशस्वीरित्या राबवण्यात आली. या स्कॉटने आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे १६ गुन्ह्याचा छडा लावत १७, ९९,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एकूण १५६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वारी वेशात सजलेल्या माऊली स्कॉडने गर्दीतील गुन्हेगारावर बारीक लक्ष ठेवून कामगिरी बजावली चैन स्नॉचिग खिसेकापू मंगळसूत्र चोरीसारख्या गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी या पथकाने उल्लेखनीय प्रयत्न केले. या स्कोर मध्ये सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे ४ अधिकारी व ४१ अंमलदार तसेच पंढरपूर शहर पोलिसांचे एक अधिकारी व १३ अंमलदार कार्यरत होते. माऊली स्कॉडने महाराष्ट्रातील नामांकित गुन्हेगारांची यादी फोटो व माहिती आधीच संकलित करून डिजिटल स्वरूपात तयार केली होती या माहितीचा वापर करून संबंधितांचे हालचाल लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करण्यात आली.
दिनांक ३० जून रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व दिनांक एक जुलै रोजी श्री तुकाराम महाराज पालखीच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशानंतर स्कॉडने विविध ठिकाणी गुप्त निगराणी ठेवत संशयीताना रंगी हात पकडले मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीना जागीच परत देण्याचे पारदर्शक प्रक्रिया राबवली गेली. या कालावधीत एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील १६ गुन्ह्यांचा छडा लागला आहे. २१ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे २०० ग्रॅम सोन्याचे दागिने चैन मंगळसूत्र अंगठ्या इत्यादी हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली माऊली स्कॉड ही संकल्पना आषाढी वारीतील भाविकांच्या सुरक्षेसाठी एक यशस्वी पाऊल ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here