श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साईबाबांच्या समकालीन भक्त कै. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या नात श्रीमती शैलजाताई शिंदे-गायकवाड यांनी श्री साई बाबांनी सुरु केलेला रुग्ण सेवा हिचं साई सेवा हा ध्यास मनी धरून श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने सेवा निरंतर सुरूच ठेवली.

श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने दिनांक 27 जुलै 2025 रोजी सोळावे मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर साई9 ग्रुप कार्यालय शेजारील अयोध्या हॉस्पिटलच्या जागेत पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडले.
यावेळी उपस्थित शंकरा आय हॉस्पिटल चे श्री प्रकाश पाटील व डॉ एस एस सौम्यश्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मुसळधार पावसाचे वातावरनात सुद्धा 27 जुलै रोजी संपन्न झालेल्या या शिबिरात जवळपास 1400 रुग्णांची मोफत तपासणी होऊन रूग्णांना मोफत चष्मा वाटप केले व 40 पेशंट ला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पनवेल येथे नेण्यात आले. शिर्डी शहर व परिसर तसेच मालेगाव, अहिल्यानगर ,येवला, संगमनेर, नेवासे, श्रीरामपूर, राहुरी, नाशिक,राहाता, कोपरगाव, धुळे आशा अनेक ठिकाणांहून आत्तापर्यंत 16050 पेक्षा जास्त गरजू व वयोवृद्ध रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला. व आत्तापर्यंत 2090 पेशंट ची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई येथे यशस्वीरित्या पार पडली. ट्रस्ट चे हे कार्य अल्पावधीतच भारतात नावारूपास आले असून ट्रस्ट च्या वतीने अशा प्रकारची सेवा ट्रस्ट च्या वतीने अविरतपणे सुरू राहील. पुढील १७ व्या मोफत शिबीराचा लाभ देशातील अनेक गरजूंनी घ्यावा असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे- गायकवाड पाटील यांनी केले. ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.संगीता गायकवाड पाटील व साई9 ग्रुप चे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांच्या विशेष परिश्रमाने कार्यक्रम सुरळीत पार पडला.
याप्रसंगी श्री अभयभैय्या शेळके माजी उपनगराध्यक्ष, श्री प्रकाश नाना शेळके माजी नगरसेवक, श्री तुषार आबा गोंदकर माजी पाणीपुरवठा सभापती, श्री प्रतापराव जगताप माजी चेअरमन गणेशनगर कारखाना, श्री अमृतराव गायके सामाजिक कार्यकर्ते, अशोक भाऊसाहेब गायके शिवछत्रपती प्रतिष्ठान अध्यक्ष,श्री धनंजय आठरे जेष्ठ उद्योजक, श्री अथर्व देशमुख युवा उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी व तसेच शिर्डी ग्रामस्थांनी ट्रस्ट च्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here