दोंडाईचा (संतोष कोळी) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त-निसर्ग-मित्र समिती तर्फे कोरोना या महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करतां गरीबांना मदत व कोरोना मुक्त साठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल धुळे जिल्हा परिषद चे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब तुषारजी रंधे साहेब यांचा धुळे जिल्हा परिषद येथे कोरोना योद्धा*म्हणून सन्मान -पत्र,शॉल,व निंबाचे रोप देऊन समिती-चे राज्यअध्यक्ष मा बापूसाहेब डी आर पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला, यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मंगेशजी पवार साहेब, धुळे जिल्हाध्यक्ष डी बी बापू पाटील, राज्य महा सचिव संतोषराव आबा पाटील,संस्थापक प्रेमकुमार अहिरे,राज्य संघटक प्रभाकर सूर्यवंशी,जिल्हा सचिव विश्वासराव पगार सर,जिल्हा प्रवक्ते प्रा डॉ प्रविणसिह गिरासे, आदी पदाधिकारी उपस्थित होते,
यावेळी प्रास्ताविक राज्य महा सचिव संतोषराव आबा पाटील व आभार प्रदर्शन -जिल्हा सचिव विश्वासराव पगार सर यांनी केले.
Home उत्तर महाराष्ट्र धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ भाऊसाहेब तुषारजी रंधे यांचा कोरोना योद्धा म्हणून ...







