दोंडाईचा (संतोष कोळी) – वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा विधानसभा अध्यक्ष आपासाहेब नामदेव येळवे, अॅड. मंगासे साहेब जिल्हा सचिव सारनाथ बोरसे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष राहुल पाटोळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच दलित आदिवासी ओबीसी मुसलमान धनगर कोळी माळी कुणबी पाटील वडर तेली न्हावी सुतार पारधी ठाकुर सह बारा बलुतेदार आठरापगड जाती जमातीच्या लोकांनी आज शिंदखेडा बसडेपो मध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा दाखवून शिंदखेडा ते दोंडाईचा बसला फुलहार टाकून रवाना केली
हे सर्व अॅड.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील सुरू करण्यात आले तरी आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पण आभार मानतो तसेच आपासाहेबानी सांगीतले की, ही बस सेवा नव्हे तर ही गोरगरिबांची रक्त वाहिनी आहे तर आज पासून ही महाराष्ट्र राज्यातील रक्त वाहिनी बस सुरू झाली आहे तरी सर्व प्रवासी ना पण वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा विधानसभा अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.







