
शेतकऱ्यांचे गुरे न सोडता ती आमच्या ताब्यात राहू द्या असा अर्ज कोर्टात सादर
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – २५ जुलै रोजी एमआयडीसी पोलिसांनी जप्त केलेल्या १४१ गुरा पैकी ८ शेतकऱ्यांची
८२ गुरे असून ते शेतकरी असून त्यांचा पारंपारिक उद्योग हा शेती आहे असे प्रथम माहिती अहवालात पोलिसांनी नोंद करून ३० जुलै रोजी त्या ८ शेतकऱ्यांसोबत सुपूर्द नामा करून त्या ८ शेतकऱ्यांना गुरे परत देण्याचे आदेश पोलिसांनी आरसी बाफना गो शाळेला दिले होते तरी सुद्धा बाफना गोशाळा या शेतकऱ्यांना अद्याप जनावरे परत केली नाही.
गो शाळेचा कोर्टात अर्ज
गो शाळेने कोर्टात फौजदारी खटला दाखल केला व जनावरे जप्त केल्यावर एमआयडीसी पोलिसांनी २५ जुलै रोजी बाफना गोषाला पत्र दिले होते व या 141 जनावरांच्या बाबत सीआरपीसी 102 प्रमाणे चौकशी करीत असून त्यात व्यापारासाठी ,शेती व्यवसायासाठी व कत्तलीसाठी किती जनावरे आहेत याचा चौकशी करून अहवाल देण्यात येईल तोपर्यंत आपल्या गोशाळेत ही जनावरे राखीव ठेवा त्यानुसार ती ठेवण्यात आली आहे परंतु
पोलिसानी २९ जुलै रोजी ६० जनावरे व ३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून बाकीचे जनावरे हे चौकशीत शेतकऱ्यांची आढळून आलेली आहे असे म्हणून ती गुरे त्वरित शेतकऱ्यांना द्या असे आदेश दिलेले आहे वास्तविक पाहता ती सर्व जनावरे कत्तली साठीच असल्याने ती आमच्याच ताब्यात राहू द्यावी असा अर्ज केला आहे
जनावरे हडपण्याचा प्रकार
बाफना गोशाळा ही 82 शेतकऱ्यांची जनावरे हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते कारण कोर्टात दाखल केलेल्या खटल्यामध्ये असेही म्हटले आहे की तीनशे रुपये प्रति जनावर प्रतिदिन प्रमाणे खावटी देण्यात यावी वास्तविक पाहता पहिल्या दिवसापासून पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की तुम्हाला एक पैसा सुद्धा खावटी भरावी लागणार नाही.
गो शाळेला कायद्यानुसार भादवि ४५७ प्रमाणे अर्ज देता येत नसला तरी त्यांनी वेळ काढू पणा करून फक्त आपली खावटी वाढावी व जेणेकरून शेतकऱ्याकडून इतके पैसे भरले जाणार नाही म्हणून तो जनावर ताब्यात घेऊ शकणार नाही ही अशी खेळणी बाफना गोशाळे तर्फे खेळली जात आहे
पोलीस स्टेशन व गोशाळेत शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले शेवटचे निवेदन
आज 20 ऑगस्ट रोजी ते आठ शेतकरी व त्यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते नगर सेवक हाजी युसूफ, एम आय एम जिल्हा अध्यक्ष झिया बागवान, कुल जमातीचे बशीर बुर्हानी, मानियार बिरदारीचे फारूक शेख, ईद गाह ट्रस्ट चे अनिस शाह,एडव्होकेट बुऱ्हान पिरजादे, शाह बिरदारीचे शकील शाह, यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन रितसर पत्र दिले व बाफना गोशाळा कुसुंबा येथे जाऊन सुद्धा पत्र दिले असता तेथे उपस्थित वाल्मिक पवार यांनी घेण्यास नकार दिला अशाप्रकारे बाफना गो सेवा केंद्र हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.
सदर ६ पानी सविस्तर निवेदन असून त्याच्या प्रति मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, पोलीस महासंचालक, सहा पोलीस महासंचालक गुप्त वार्ता विभाग,विशेष पोलीस महानिरीक्षक,नासिक,जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक जळगांव यांनासुद्धा देण्यात आल्या आहेत.






