नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : जिल्ह्यातील देवळा भागातील विठेवाडी ते झिरेपिंपळ मटाणा फाटा हा ४ किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. सर्वत्र जंबो खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्यावरुन जाताना जिव धोक्यात घालून जावं लागत आहे. या रस्त्याबाबत अनेक तक्रारी केल्यानंतरही प्रशासन याची दखल घेत नव्हते. अखेरीस कळवण पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब निकम यांनी मुरूम टाकून खड्डयांची डागडुजी केली आहे.
विठेवाडी, झिरेपिंपळ विठेवाडी ते झिरेपिंपळ मटाणा फाटा रस्ता अतिशय खराब झाला आहे, सदर चार कि,मी, रस्ता हा पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे, परंतु कार्यादेश नसल्याने काम रखडले आहे असं समजते, येत्या १५/२० व दिवसांत वर्कआड्रर मिळाली की रस्त्याचे काम सुरू केले जाईल असे संबंधित ठेकेदार व शाखा अभियंता यांनी दुरध्वनी द्वारे कळवले आहे.
– कुबेर जाधव
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना
याबाबत अधिक माहिती अशी की, विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी कळवण पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब निकम हे आपल्या चार चाकी गाडीने विठेवाडी येथे येत असताना विठेवाडी गावाजवळ जिरे पिंपळ रस्त्यावर खड्ड्यामध्ये गाडी अडकुन तिचे चेंबर घासले गेले, त्यांची तब्येत बरी नसल्याने ते गाडी हळूच चालवत होते त्यामुळे अपघात टळला. पण पुन्हा कोणावर असा प्रसंग येवू नये म्हणून त्यांनी तत्परतेने स्वतःचे जेसीबी व दोन ट्रॅक्टर लावून तात्काळ एक तासाच्या आत चाऱ्या व एक दिड कि, मीटर अंतरावरील जंबो खड्ड्यामध्ये स्वतः हजर राहून मजुर लावुन जाड मुरूम टाकून तात्पुरता का होईना उपाय म्हणून रस्ता रहदारी योग्य करून घेतला.
विठेवाडी झिरेपिंपळ, वीठेवाडी ते झिरेपिंपळ रस्त्यावरील खड्ड्यामध्ये जाड मुरूम टाकून डागडुगी करून सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल बाळासाहेब निकम यांचे गावकरी व पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केले आहे, यावेळी विठेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी चेअरमन कुबेर जाधव, विद्यमान चेअरमन पि डी निकम,व्हा चेअरमन जिभाउ बोरसे, प्रभाकर निकम, राजेंद्र क्रुषणा निकम,खामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी आढाव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र शेवाळे, अशोक शेवाळे हे ही उपस्थित होते,







