दिव्यांग अमोल पाटीलच्या जन्मदिनी केले वृक्षारोपण व सैनिक कल्याणला मदत निधी

अमोल पाटील

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : विधायक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत दिव्यांग चि.अमोल शांताराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवाभावी संस्था व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला आर्थिक मदत व निधी देत विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले.

यापूर्वी अमोल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२० ला कोविड महामारीच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधी११००० रू.दिले वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अनेक आदिवासी वाचनालय व अभ्यासिकेला एमपीएससी, यूपीएससी ,स्टाफ सिलेक्शन कमिशन, एनडीए सारख्या स्पर्धा परीक्षाची पुस्तके भेट म्हणून दिली.आज ३४व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कन्हैयालाल महाराज मंदिरासाठी एक किलो पितळ खरेदीसाठी ११०० रुपये दिले.शिवाय देशाच्या कल्याणासाठी सुरक्षेसाठी अहोरात्र हृदयाचे खडे आणि रक्ताचे पाणी करणाऱ्या डोळ्यात तेल घालून,कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून,सेवा बजावणाऱ्या पोलीस आणि सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून दिव्यांग अमोल पाटील यांचे कडून २१०० रुपये रोख जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला मदत म्हणून दिले.
पर्यावरणाचे जतन व संवर्धन व्हावे,या उद्देशाने वृक्षारोपण करतानाच आज वनसंवर्धन दिनानिमित्त मागील वर्षी लावलेल्या वृक्षाचे जतन व संवर्धन केले ,त्यांचे पूजन करून आज पुन्हा साग,आवळा,आंबा, चिंच,जांभूळ, लिंबू,रेन ट्री, कनेर ,मोगरा अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पी.एम.सावळे यांनी केले व सूत्रसंचालन ईश्वर ठाकरे यांनी केले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा‌.जि.प.सदस्य एड.ज्ञानेश्वर एखंडे, संभाजीराव अहिरराव,सामोडे येथील सरपंच आरतीताई भारुडे,उपसरपंच रावसाहेब घरटे,पिंपळनेर पो. स्टे.चे ए.एस.आय.आय.जी.शिरसाट जयेश मराठे ,नेत्र विशारद डॉ.अरुण ओझरकर,ओरिसा येथील सुरेंद्र महाकुड,डॉ.विनोद कोठावदे,ए.पी.दशपुते, प्रा.सी‌.एन‌.घरटे, किशोर विसपुते, भरत बिरारीस,फकीरा बिरारीस,जगदीश शिंदे, हंसराज शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी,नरेंद्र परदेशी, ग्रा.वि.अ. सुनील लाड,फुलसिंग कुवर, शिवचंद्र भदाणे,सुशिल पाटील, दिपक राजपुत,सुरेश अहिरे, चिंतामण ठाकरे,अभि महाकुंड, आकाश माळीआदी मान्यवरांनी वृक्ष लागवड करून दिव्यांग अमोलचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here