ठाणे शहर पोलिसांनी मोबाईल चोरीचे १० गुन्हे उघड करीत मोबाईल केले हस्तगत

ठाणे शहर पोलिसांनी

ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) : भोईवाडा पोलीस ठाणे भिवंडी येथील गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जनार्दन सोनवणे, पोउपनिरी रविंद्र पाटील व पथक समांतर तपास करत असतांना त्यांनी आरोपितांना ताब्यात घेत १० मोबाईल फोन चोरीचे गुन्हे उघड करत १० वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन असा १ लाख १३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सज्जाउद्दीन मोहमंद मारुफ सैय्यद उर्फ गुड्डू (वय ३६, रा.गगन बिल्डींग, ४ था मजला, रुम नं. ४०३, बिलाल हॉस्पीटलसमोर, कौसा, मुंब्रा) याला राजनोली बायपास येथून शिताफीने अटक केली. आरोपीताची पोलीस कोठडी दरम्यान विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने १० मोबाईल चोरीचे गुन्हे कबूल केले. त्याच्याजवळून १० मोबाईल फोन चोरीचे गुन्हे उघड करत १० वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन असा १ लाख १३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमधील २, शिळडायघर पोलीस ठाणेमधील १, निजामपुरा पोलिस ठाणे येथील १, कोनगाव पोलीस ठाणे येथील २, शांतीनगर पोलिस ठाणेमधील ४ असे १० गुन्हे तसेच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल मिसिंग मधील मोबाईल CEIR पोर्टलच्या आधारे घटक २, भिवंडी यांनी ४०, घटक ३ कल्याण यांनी ४७, घटक ४ उल्हासनगर यांनी १६ असे एकूण ११३ स्मार्ट फोन हस्तगत केले असून, त्यांची किंमत १५ लाख ७५ हजार ५०० रुपये आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, उपआयुक्त ठाणे शहर अमरसिंह जाधव, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे शोध १ शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, वपोनिरी योगेश आव्हाड, वपोनिरी अजित शिंदे, सपोनिरी श्रीराज माळी, सपोनिरी मिथून भोईर, पोउपनिरी रविंद्र पाटील, पोउपनिरी किरण भिसे, सपोउपनिरी सुधाकर चौधरी, पोहवा प्रकाश पाटील, वामन भोईर, प्रशांत सणे, शशिकांत यादव, सुरेश घाग, पोहवा मंगेश जाधव, विलास कडू, पोशि विजय कुंभार, भावेश घरत, अमोल इंगळे, रामदास उगले, मपोहवा अनुष्का पाटील, दक्षता सुतार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here