दिल्लीत खासगी रूग्णालयात लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, १० जखमी

दिल्ली

दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्व दिल्लीतील आनंद विहार परिसरात असलेल्या एका खाजगी कॉसमॉस रुग्णालयात शनिवारी भीषण आग लागली. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी आग लागली, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि किमान १० जण जखमी झाले.

मृत व्यक्तीचे नाव अमित असे आहे. तो रुग्णालयात सफाई कामगार होता. आगीच्या घटनेनंतर त्याने दुसऱ्या मजल्यावरील शौचालयात स्वतःला कोंडून घेतले. त्यानंतर गुदमरून त्याचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुपारी १२:१२ वाजता आगीची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
जखमींपैकी सात जणांना आनंद विहार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here