कुऱ्हा पानाचे येथे कोरोना चाचणी कॅम्प; २ स्वॅब आढळले पॉझिटिव्ह

भुसावळ (तालुका प्रतिनिधी गिरीश पवार) – डॉ. प्रिया बोंबटकार यांनी रॅपिड अँटीजन टेस्ट चे २९ स्वॅब घेतले त्यापैकी ०२स्वॅब पॉझिटिव्ह निघाले. त्यांना लगेच 108 रुग्ण वाहिका बोलवून भुसावळ येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा आरोग्य अधिकारी डो . दिलीप पाटोदे यांच्या आदेशान्वये रॅपिड अँटीजन टेस्ट कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात गावातील २९जणांची रेपिड स्वेब तपासणी करण्यात आली असून त्यातील ०२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .
कुऱ्हा पानाचे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मधे दि २१ रोजी आयोजित शिबिरात कुऱ्हा प्राथमिक उपकेंद्राचा समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रिया बोंबटकार यांनी अतिरिक्त जिल्हा अारोग्य अधिकारी डो. प्रमोद पांढरे व तालुका वैद्यकिय अधिकारी डो संगिता दवंगे यांचा मार्गदर्शना खाली स्वेब घेऊन शिबिर संपन्न केले.
या प्रसंगी डॉ. बोंबटकार यांच्यासह आरोग्य सहाययक एस. एन . माळी ,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका सोनवणे ,आरोग्य सेवक आर.बी. अटवाल यांनी स्वॅब तपासणी करताना मदत केली.सर्व आयोजन व नियोजन हे आरोग्य सहाययक डॉ .एस. एन. माळी, डॉ. प्रिया , डॉ. उमेश बडगुजर व गावातील आशा सेविका यांनी केले. तसेच मंगळवार दि. २५/०८/२०२० रोजी अजून मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात येणार आहे.त्या दिवशी गावातील व्यवसायिक ,दुकानदार, डॉक्टर व गावातील अजून कोणाला ही टेस्ट करायची असेल तर त्यांनी मंगळवारी उपस्तीत राहावे अशी माहिती डॉ प्रिया मॅडम यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here