जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला उच्चांक

आज तब्बल ८७० कोरोनाबाधित आढळले; ५६६ रुग्णांनी केली कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या रोज नवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. आज (दि.२१) सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्याततब्बल ८७० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच एका दिवसात आठशे पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले असून आजपर्यंतचा कोरोनाबाधित सापडण्याचा हा उच्चांक आहे. आढळून आलेल्या रुग्णात जळगाव शहरात सर्वाधिक २२२ कोरोनाबाधित आहेत.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार आज आढळून आलेल्या ८७० कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर – २२२, जळगाव ग्रामीण – ७२, भुसावळ – १०, अमळनेर – ४४, चोपडा – ८४, पाचोरा – १४, भडगाव – ४०, धरणगाव – ७१, यावल – २५, एरंडोल – ५३, जामनेर – ३७, रावेर – ८६, पारोळा – ३७, चाळीसगाव – ६५, मुक्ताईनगर – ३, बोदवड – ५ असा समावेश आहे.सद्यपरिस्थितीत ५ हजार ८४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची २१ हजार ०९७ इतकी झालेली आहे. यातील १४ हजार ५४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, आजच ५६६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत झालेल्यांचा एकूण आकडा ७१३ इतका झालेला आहे.

Press Note Aug 21, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here