जालन्याच्या तरुणीवर बीडच्या गेवराईत गोळीबार

gun-fire
file photo

बीड (प्रतिनिधी) : जालन्याच्या तरुणीवर बीडच्या गेवराईत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गेवराई पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

जालन्याच्या शहागड येथील खामगाव परिसरात राहणारी शीतल कटमिल्ला पवार (वय ३०) ही तरूणी तिच्या मैत्रीणीसह रविवारी सायंकाळी गेवराईला खरेदीसाठी आली होती. त्यावेळी तोंडाला बांधून आलेल्या दोन ते तीन जणांनी दोघींना मारहाण केली. या दरम्यान दोघी तरुणी वेगवेगळ्या दिशेने पळाल्या.
यावेळी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात शीतल पवार या तरुणीच्या छातीत गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली. रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गंभीर जखमी अवस्थेत तिला बीडच्या जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here