पुण्यातून दोन बांगलादेशी महिलांना अटक

अटक
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : कात्रजमधील सुखसागरनगर परिसरात बेकायदा वास्तव्य करणार्‍या दोन बांगलादेशी महिलांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने अटक केली. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मुसम्मद सोनी अब्दुल समद खातून (वय २२) आणि मोनीरा बेगम (वय १९, दोघी मूळ रा. गुजिया, जि. बोगारा, बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांची नावे आहेत. यापूर्वीच शहरात बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

मुसम्मद सोनी व मोनीरा बेगम या बांगलादेशी महिला कात्रजमध्ये बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल घावटे आणि प्रफुल्ल मोरे यांना मिळाली. त्याआधारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने दोघींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.चौकशीत त्यांच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र सापडले. धक्कादायक बाब म्हणजे, दोघीही घुसखोरी करुन थेट भारतात आल्याची माहिती मिळाली आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस कर्मचारी राजेंद्र नलावडे, कानिफनाथ कारखेले, अमोल घावटे, गणेश थोरात, प्रफुल्ल मोरे, भरत गुंडवाड, गणेश माने, सर्जेराव सरगर, शिवाजी सातपुते, शीतल जमदाडे, नेहा तापकीर यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here