जबलपूरमध्ये पाच हेल्मेटधारी दरोडेखोरांनी बँक लुटली; १४ कोटींचे दागिने लंपास

crime
file photo

जबलपूर (वृत्तसंस्था) : शहरातील बँकेवर दरोडा पडला आहे. पाच दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या १४ कोटींचे दगिने आणि पाच लाखांची रकम लंपास केली.सेहोर तालुक्यातील खितोला परिसरातील एका छोट्या बँकेवर सोमवारी सकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी दरोडा पडला होता, सकाळी कामकाज सुरू झाले. तेव्हा सुरक्षा रक्षक नव्हता. त्याचा गैरफायदा उठवत दरोडेखोरांनी डाव साधला. केवळ २० मिनिटांत मुद्देमाल घेऊन ते पसार झाले.

बँकेच्या लॉकरमध्ये १४ किलो ८७५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये ठेवले होते. दरोडेखोर दोन दुचाकीवरुन आले होते. त्यांनी हेल्मेट घातले होते. दरोडा पडला तेव्हा सहा कर्मचारी बँकेत होते. एकाकडे पिस्तूल होते. अन्य दरोडेखोरांकडे कोणतीही हत्यारे नव्हती, असे सीसीटीव्हीत दिसून आले.
बँक कर्मचार्‍यांनी घटनेनंतर ४५ मिनिटांनी दरोड्याची माहिती दिली. वेळेवर माहिती दिली असती तर दरोडेखोरांना पकडण्यात यश आले असते, असे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, बँक सकाळी साडेदहा वाजता उघडली जाते. घटनेदिवशी मात्र, ती सणांमुळे आठ वाजताच उघडली होती. या संधीचा गैरफायदा दरोडेखोरांनी घेतला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here