पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस फौजदार संजय दामोदर शिरसाट यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक घोषित झाले आहे.
संजय शिरसाट हे १९९३ साली पुणे शहर पोलिस दलात पोलिस शिपाई या पदावर भरती झाले. त्यांनी आजवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये, विविध शाखांमध्ये काम करत असताना उत्कृष्ट काम केले. आर्थिक गुन्हे शाखेत काम करत असताना त्यांनी बंडगार्डन, विश्रामबाग, भारती विद्यापीठ, हडपसरमधील आर्थिक गुन्ह्यात आरोपींना अटक करुन न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र सादर केले.
त्यांना आजवरच्या कार्यकाळात २९१ बक्षिसे त्यांनी मिळाली आहेत. १ मे रोजी त्यांना पोलिस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.







