गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल महाराष्ट्रातील ८ जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

राष्ट्रपती पोलीस पदक

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : महाराष्ट्र कारागृह विभागातील ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी राजाराम भोसले यांच्यासह ८ जणांना राष्ट्रपतीचे गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.कारागृह अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या सेवा कालावधीत कर्तव्याप्रती दाखविलेली सचोटी व निष्ठा आणि गुणवत्तापूर्ण केलेल्या कार्यामुळे त्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक घोषित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील राणी राजाराम भोसले, अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह, राजाराम रावसाहेब भोसले, अतिरिक्त अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह, गजानन काशिनाथ सरोदे, उपअधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह, संजय गंगाराम शिवगण, सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह, सुधाकर ओंकार चव्हाण, हवालदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह, राजेश मधुकर सावंत, हवालदार, भायखळा जिल्हा कारागृह, संजय सदाशिव जाधव, हवालदार, भायखळा जिल्हा कारागृह, विद्या भरत ढेंबरे, कारागृह शिपाई, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
कारागृह विभागाच्या वतीने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवाचे सुहास वारके आणि विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांनी राष्ट्रपती पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here