भररस्त्यात खाजगी बसला लागली भीषण आग

भीषण आग

लातूर (जिल्हा प्रतिनिधी अजय कल्याने) : औसा शहरातील मुख्य रस्त्यावर आज सकाळी घडलेल्या घटनेने नागरिकांना एकच धक्का बसला. पुण्यावरून लातूरकडे येणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसने शहरात प्रवेश करताच अचानक भीषण आग धुमसली.

पहाटेच्या गारव्यामध्ये शांतपणे प्रवास सुरू असताना, टायर फुटल्याचा मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच बसच्या चाकाजवळून धुराचे लोट निघू लागले. चालकाने तत्परता दाखवत गाडी थांबवली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली, पण बस मात्र आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.
औसा शहरातील मुख्य रस्त्यावर आज सकाळी घडलेल्या घटनेने नागरिकांना एकच धक्का बसला. पुण्यावरून लातूरकडे येणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसने शहरात प्रवेश करताच अचानक भीषण आग धुमसली.चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here