पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : तालुक्यातील सोनके येथील श्रीनाथ विद्यालय येथे देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री आर. बी. जाधव साहेब उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव- श्री अंकुश अण्णा इंगोले व सोनके गावचे प्रथम नागरिक, विद्यमान सरपंच श्री राजू चंदनशिवे, सोनके गावचे माजी सरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, गावचे पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रतिमा पूजन, ध्वज पूजन करण्यात आले. विद्यालयातील इ. 10 वी. च्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी परेड सादर केली. इ. 5 वी ते इ.10 वी मधील सर्व विद्यार्थ्यांनी खडे कवायत प्रकार, बैठे कवायत प्रकार, डंबेल्स प्रकार उत्कृष्ठ प्रकारे सादर केले.याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी समाज जागृती व देशभक्तीपर मनोगते व्यक्त केली.
सन 2024-25 मध्ये S.S.C परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार / सन्मान करण्यात आला. सोनके गावचे नागरिक श्री हनुमंत सोपान कोळेकर यांनी घोषित केलेले प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री महेश इंगोले सर यांनी शाळेचा विकास व भविष्यातील ध्येयधोरणे या विषयी माहिती दिली. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सोनके व परिसरातील नागरिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







