महाराष्ट्र पोलिस दलात १५ हजार पदभरती

महाराष्ट्र पोलिस

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : महाराष्ट्र पोलिस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार असून, भरती प्रक्रियेस आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

राज्याच्या पोलिस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली आणि २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहेत. पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार असून लवकरच त्याची जाहिरात प्रकाशित होण्याची शक्यता आहे. यात पोलिस शिपाई – १० हजार ९०८, पोलिस शिपाई चालक – २३४, बॅण्डस् मॅन – २५, सशस्त्री पोलिस शिपाई – २ हजार ३९३, कारागृह शिपाई – ५५४ या पदांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेणार…
पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत. पोलिस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण आणि खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here