नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : जिल्ह्यातील सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक ठप्प होत असून, याचा फटका नागरिकांना बसत आहे.
याच त्रासाला कंटाळून माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले. जो पर्यंत रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असं चव्हाण म्हणाले.







