मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : अंधेरी पूर्वेत न्यू पोलीस वसाहतीमध्ये एका पोलीस हवालदारने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारे हवालदार मरोळ एलमध्ये कार्यरत होते.
मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून मरोळ एलमध्ये नोकरीपासून पोलीस हवालदार गैरहजर होते.त्यांना तीन महिन्यापासून काविळीचा आजार होता. त्यांचा या आजारावर उपचार सुरू होता. या उपचारादरम्यान त्यांची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्यामुळे पोलीस हवालदार तणावात होते. मागितलं तीन ते साडेतीन महिन्यापासून मरोळ एलमध्ये देखील नोकरीपासून पोलीस हवालदार गैरहजर होते.
त्यांची पत्नी मुलं नसल्यामुळे आणि आजारांपासून ते त्रस्त असल्याने पोलीस हवालदाराने काल आपल्या घरामध्ये पंख्यामधून गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. आजार आणि कुटुंबासोबत नसल्याच्या तणावातून आत्महत्या करत आहेत असं लिहून आत्महत्या केली. सध्या अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल करून पोलीस हवलदार ने टोकाचा पाऊल का उचलला ? या संदर्भात अधिक तपास करत आहे.






