जळगाव (संपादक सुनिल पाटील) : काल मुख्यमंत्री महोदय सोलापूर दौऱ्यावर होते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा जळगाव दौऱ्यावर होते. दोघांनी पण एकच घोषणा केली आणि ती म्हणजे जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात आय टी हब उभारणीच्या कामाला सुरुवात करू.केवळ घोषणाच करून थांबले नाही तर जागेची पाहणी पण सुरू केली त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तेथील जनतेचे अभिनंदन. विशेष अभिनंदन तेथील लोकप्रतिनिधी चे कारण त्यांनी योग्य तो दबाव सत्ताधारी राज्यकर्त्यांवर टाकला आणि काम करून घेतले.
आता योगायोग म्हणायचा की त्या जिल्ह्यांचे पक्षाला राजकीय फायदा आणि महत्व.आता नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत विचार केला तर नाशिक हे मुंबई पुण्यानंतर सर्वात महत्त्वाचे शहर आहे असे शासकीय आणि भौगोलिक दृष्टीने मानलं जातं. तिन्ही शहरांना जोडणारा सुवर्ण त्रिकोण पण संबोधलं जातं, अनेक वेळा आय टी हब ची घोषणा झाली, त्यात मा, शरदराव पवार,ना छगनराव भुजबळ हे ही सामिल होते,जागेच पण सर्वेक्षण झाले होते तरी पण घोड कुठे अडंल? हा अभ्यासाचा भाग आहे.
पवित्र गोदावरी,अफाट भुभाग, अनूकुल पर्जन्यमान निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या नाशिक ला काहीच मिळत नाही.स्वर्गिय मा उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून मिळालेले एच ए एल सोडलं तर बाकी काही नाही,यावर गंभीर विचार केला तर येथील खुजे राजकीय नेतृत्व हे प्रकार्षाने जाणवते. तसेच राजकीय नेतृत्वात व्हिजन नाही, किंव्हा तेवढी प्रगल्भता नाही.दहा बारा वर्षांपूर्वी ना छगन भुजबळ नाशिक चे पालक मंत्री हे आणि नाशिकला दत्तक घेऊन नाशिकचा चेहरामोहरा बदलणारे मुख्यमंत्री फडणवीस या बाबतीत तोंड उघडत नाहीत, केवळ शे दोनशे पाचशे मीटर रस्त्याचे उद्घघाटन आणि किंवा एखादं सामाजिक सभागृह इथपर्यंतच यांची मजल आहे.तेही आर्थिक गणित समोर ठेवून.आता जनतेनेच विचार करून नाशिकच्या लोकप्रतिनिधी चे काय करायचे? यावर विचार करण्याची वेळ आली आहे,.तीन तीन टर्म लोकांनी मदत करूनही काही कांम होत नसतिल तर यांनी राजीनामा द्यावा.
आता जनतेनं नाशिक साठी पुढं यावं आणि मोठं आंदोलन उभं करावं. आणी नाशिक साठी आय टी हब, नार पार उर्ध गोदावरी प्रकल्प, नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प ,गोदावरी प्रदूषणमुक्त, कांदा आणि द्राक्ष यासाठी दिर्घकालिन धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, जनतेनेच त्यांना समज द्यावी अन्यथा त्यांना होणाऱ्या राजकीय परिणामांची जाणीव करून द्यावी,







