नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) । येथील बन्सी बंगला, जेलरोड परिसरात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळी मूर्ती चोरीप्रकरणी नाशिकरोड गुन्हेशोध पथकाने २४ तासांच्या आत कारवाई करून आरोपीला गजाआड केले आहे. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले.
फिर्यादी सुशिला बन्सीलाल चंद्रमोरे यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून अंदाजे १.५ किलो वजनाची पितळी मूर्ती, मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल फोन आणि रोख ५ हजार रुपये असा मिळून १७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव आणि योगेश रानडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक संशयित आरोपी बिटको चौक परिसरात चोरीचा माल विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनसार बगिर पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून कारवाई केली. त्यात आरोपी गौरव आनंद बाविस्कर (वय २०, रा. पाटील गॅरेज जवळ, देवळालीगाव, नाशिकरोड) याला पकडण्यात आले.
या कारवाईत उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस डॉ. आयुक्त सचिन बारी यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बडेसाब नाईकवाडे, सपोनि प्रवीण सूर्यवंशी, पोउनि संदीप पवार तसेच पोहवा विशाल पाटील, विष्णुगोसावी, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी केली.आरोपीला तातडीने अटक केल्याने बुद्धविहार समितीने सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाचे अभिनंदन करून सत्कार केला.







