बुलडाणा पोलिसांची कारवाई : नांदुरा शहरातील शाहीन कॉलनीत ४१ तलवारी जप्त

४१ तलवारी जप्त

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी सचिन जगदाळे) : नांदुरा येथील शाहीन कॉलनीत धारदार तलवारी विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीसांनी तात्काळ कारवाई करत ८२ हजार रुपये किंमतीच्या ४१ तलवारींसह काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल, मोबाईल फोन असा एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, बुधवारी (दि.२०) अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा यांना बुलडाणा पोलीसमिळालेल्या माहितीवरून स्वतः श्रेणिक लोढा, सपोनि सचिन पाटील, पोकाँ शिवशंकर वायाळ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकाँ चाँद शेख, गणेश पाटील यांनी नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम (वय ३३, रा.शाहीन कॉलनी नांदुरा) हा आपल्या राहत्या घरुन अवैधरित्या धारदार तलवारी पल्सर मोटारसायकल (क्र.एम.एच.२८, बी.एन.२२७७) वर एका पांढऱ्या रंगाच्या पाोतडीचा लांब गठ्ठा गाडीवरून घेऊन जाण्याच्या तयारी आढळला. पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पंचांनी खात्री करून त्याची चौकशी केली असता, त्याने नाव सांगतांना पांढऱ्या गठ्ठ्यात लाल म्यान असलेल्या, दोन्ही बाजूने कोरलेल्या मुठीसह ८२ से.मी. लांबी व पात्याची लांबी ७० से.मी. असलेल्या व सिरोही की सुप्रसिध्द तलवार १०० साल वारंटी असे दोन्ही बाजूने कोरलेल्या ४१ तलवारी आढळून आल्या.
त्याच्याजवळून सदर ४१ तलवारी किंमत ८२ हजार, काळ्या रंगाची पल्सर १२५ सीसी किंमत ८० हजार, रु.२० हजार किंमतीचा व्हिवो कंपनीचा चॉकलेटी मोबाईल असा एकूण १ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेख वसीम शेख सलीम याला ताब्यात घेऊन नांदुरा पोलिसांकडे पुढील तपासासाठी सोपविण्यात आले आहे.बुलडाणा पोलीस
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, सपोनि सचिन पाटील व सहकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोनि सुनिल अंबुलकर व स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here