बायकोला जिवंत जाळणा-या आरोपी नवऱ्याचा पोलिसांनी केला एन्काऊंटर

crime
file photo

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) । ग्रेटर नोएडामध्ये ३६ लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळणारा आरोपी नवरा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये जखमी झाला. फरार आरोपी विपिनने ताब्यात असताना पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांकडून पिस्तूल हिसकावले. पोलिसांनी गोळी झाडल्यानंतर तो जखमी होऊन पकडला गेला

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी ग्रेटर नोएडा येथे विपिनने त्याच्या पत्नीला, निक्कीला जिवंत जाळले. त्यानंतर निक्कीच्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. निक्कीच्या कुटुंबीयांना आंदोलन करत न्यायाची मागणी केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणी निक्कीचा नवरा विपिन, तिची सासू, सासरा आणि मेहुणा यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विपिनने त्याच्या सात वर्षीय मुलासमोर पत्नीला जिंवत जाळले होते. या घटनेनंतर आरोपी विपिन फरार झाला होता. शेजाऱ्यांच्या मदतीने निक्कीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही कारणांमुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण रुग्णालयात नेत असताना वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला. हुंड्यासाठी विपिन आणि त्याचे कुटुंबीय निक्कीचा छळ करत होते. ३६ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी विपिनने निक्कीला जिवंत जाळल्याचे म्हटले जात आहे.
फरार विपिनला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस त्याला मेडिकलसाठी घेऊन जात होते. त्यादरम्यान त्याने रस्त्यात कारमधून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने पोलिसांकडून पिस्तूलदेखील हिसकावले होते. त्याच्या दिशेने पोलिसांनी गोळी झाडली. गोळी विपिनच्या पायावर लागली आणि तो खाली कोसळला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here