‘हनी ट्रॅप’ पेक्षा धोकादायक ठरत आहे ‘मनी ट्रॅप’

बनावट सावकार आयुष शहा

बनावट सावकार आयुष शहा आणि कुटुंबीय यांच्याविरोधात गायक-उद्योजक विश्वजित घोष यांचा खंडणी फसवणूक आणि १० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला

  • कर्जाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या कोऱ्या धनादेशांचा खंडणी साठी शस्त्र म्हणून गैरवापर..
  • बनावट सावकाराचे कृत्य.
  • बनावट सावकार असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या आयुष, मौसम व अशित शाह विरोधात न्यायालयात फौजदारी खटला दाखल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) । ‘ टी-सीरिज’ च्या पदार्पणातून सुप्रसिद्ध झालेल्या ‘सौ फिक्र’ साठी ओळखले जाणारे प्रसिद्ध गायक अभिनेता तथा उद्योजक विमान वाहतूक आणि व्यावसायिक प्रशिक्षण कंपनी “मायफ्लेज प्रायव्हेट लिमिटेडचे” संस्थापक विश्वजीत घोष यांनी आयुष शाह, मौसम शाह आणि अशित शाह यांच्याविरुद्ध १० कोटी रुपयांचा मानहानी आणि फसवणूक आणि खंडणीचा खटला न्यायालयात दाखल केला असल्याची माहिती आमच्या विशेष प्रतिनिधीला पुराव्यासह दिली.

याबाबत या विशेष प्रतिनिधींने कागदपत्र तपासली असता, असे दिसून आले की, आयुष शाह, त्यांची बहीण मौसम शाह आणि वडील अशित शाह यांनी प्रसिद्ध गायक आणि उद्योजक विश्वजीत घोष यांच्याकडे जनसंपर्क म्हणून डिजिटल मार्केटिंगमध्ये मदत करण्यासाठी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांनी श्री. घोष यांना महाराष्ट्र सरकारकडून कर्ज देण्याचा अधिकृत परवाना असलेल्या परवानाधारक सावकार असल्याचे भासवत राष्ट्रीयकृत बँकेच्या दराने कर्ज देऊ केले, परंतु कर्जाच्या मूल्याच्या अनेक पट किमतीच्या कोऱ्या सुरक्षा धनादेशांची मागणी केली. ७२ लाख रुपयांच्या कर्जावर २.५ कोटी रुपये परतफेड केल्यानंतर. सुरक्षा धनादेशांची मागणी केली असता, या तिघांनी प्रथम टाळाटाळ केली व नंतर धनादेश लॉकरमध्ये असल्याच्या कारणावरून धनादेश परत केले नाहीत. सदर धनादेश बँकेत वटवण्यासाठी टाकून, चेक बाऊंन्सचे खटले टाकून बदनामी करण्याची श्री.घोष व त्यांच्या पत्नीला धमकी देत दररोज ३ लाख रुपयांची खंडणी मागणी केली.

अखेरीस शाह त्रिकुटाच्या सावकार परवान्याबाबत तपशीलवार चौकशी केली असता शहा कुटुंबाकडे सावकारी परवानाच नसल्याची माहिती उघड झाली. त्यामुळे विश्वजित घोष यांना शहा याने सावकारी परवाना असल्याचे खोटे सांगून कर्जाच्या परतफेडीचा सुरक्षेसाठी दिलेल्या धनादेश यांचा गैरवापर करून विश्वासघात आणि फसवणूक करून खंडणी मागणी करत असल्याचे लक्षात आले. सदर माहिती घोष यांनी शाह यांना विचारल्यानंतर त्यांनी श्री. घोष यांची प्रतिमा जाणूनबुजून खराब करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे. प्रसारित झालेल्या बातम्या घोष यांच्या मित्र परिवार तसेच इतर व्यवसायाशी निगडीत लोकांना पाठवून त्याद्वारे घोष यांना मानसिक त्रास देऊन बदनामी करून घोष यांनी दबावात येऊन आणखी खंडणी द्यावी यासाठी बातम्या व्हायरल करणे सुरू केले. याप्रकरणी शाह यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात आणि न्यायालयात विविध फौजदारी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष शहा याने कथित फसव्या व्यवहारांमुळे आणि बनावट बातम्यांद्वारे घोष यांना दबाव सुरू केला. यातील फिर्यादी विश्वजीत घोष यांनी ओशिवरा पोलीस ठाणे येथे २५ जानेवारी २०२५ रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे. तसेच शाह त्रिकुटाने केलेल्या प्रतिमा हननासाठी १० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई व फौजदारी खटला न्यायालयात दाखल केला आहे. यासोबत श्री. घोष यांनी शाह यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून खंडणी, फसवणूक आणि विश्वासघाताचा स्वतंत्र न्यायालयातून खटला देखील दाखल केलेला आहे.

मायफ्लेज कंपनी बाबत थोडक्यात 

विश्वजीत घोष यांची मायफ्लेज विमान वाहतूक आणि सर्व्हिस क्षेत्रातील विशेष प्रशिक्षण देणारा एक प्रमुख संस्थेचा समूह आहे. देशभरात १५ पेक्षा जास्त शाखांसह, या समुहाने व्यावसायिक विकास आणि व्यावसायिक शिक्षणात अग्रेसर म्हणून स्वतःला स्थापित केले आहे, विशेषतः विमान वाहतूक आणि आतिथ्य क्षेत्रातील प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेवांमध्ये त्यांचे मोठे कार्य असून, त्यांच्या बंगळुरू, मंगलोर, मुंबई, नवी मुंबई, सुरत, भोपाळ, लखनौ, सिलिगुडी, रायपूर, गुवाहाटी, चंदीगड आणि डेहरादून येथे शाखा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here