धमतरी (छत्तीसगड) (वृत्तसंस्था) । जिल्ह्यातील सिहवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरा गावात पत्नीने अंडी करी बनवण्यास नकार दिल्याने रागात नव-याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव, टिकुराम सेन (वय ४०) आहे. टिकूराम सेन यांनी घरी जेवणासाठी अंडी आणली होती. घरी आल्यानंतर त्याने बायकोला अंडी करी बनवण्यास सांगितलं. पण करू भातचा सण होता आणि ती दुसऱ्या दिवशी उपवास करणार होती.
त्यामुळे त्याच्या बायकोनं अंडा करी बनवण्यास नकार दिला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याचा राग आल्यानं त्याने घराबाहेर जात आत्महत्या केली. “छत्तीसगडमधील विवाहित महिला तीज सणाच्या आदल्या दिवशी कारले आणि भात एकत्र करुन केलेला पदार्थ ‘करू भात’ महिला खात असतात. विवाहित महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी उपवास करतात. दुसऱ्या दिवशी ‘निर्जला’ उपवास करण्यापूर्वी ते शेवटचे जेवण म्हणून करू भात खात असतात,” असे अधिकाऱ्याने सांगितलं.







