मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेलही केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. मागील दोन वर्षांपासून आरोपी मुलीला हे अश्लील व्हिडीओ फोटो दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याबाबत जबरदस्ती करत होता. गोरेगावच्या रॉयल पॉम व्हिला, आरे कॉलनी येथे आयोजित केलेल्या पार्टीत आरोपीने हे पार्टीत आरोपीने हे कृत्य केल्याचे मुलीने तक्रारीत म्हंटले आहे.
मानसिक तणाव आणि रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर १७ वर्षीय मुलीने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अजिम रहिम खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.







