शेतकरी नेते रुपेश ढवण यांचे सलग ५ व्या दिवशी आमरण उपोषण सुरूच

शेतकरी नेते रुपेश ढवण

अहिल्यानगर (अहमदनगर) (जिल्हा क्राइम रिपोर्टर दिपक वरखडे) । शेतकऱ्यां ची कर्ज माफी , कांदा भाव वाढ , कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी , या आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गेल्या सलग ४ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले युवा शेतकरी नेते व आपली माती , आपली माणसं या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रूपेश ढवण यांनी उभारलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघोज येथे आज रविवार दि . २४ रोजी संपूर्ण गाव बंद राहणार असून सकाळी १० वाजता बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर वारकरी , शेतकरी , व्यापारी , ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य रस्ता रोको आयोजित करण्यात आले आहे .

युवा शेतकरी नेता रुपेश ढवण यांनी नुकतेच २० दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या च प्रश्नांवर ४ दिवस अन्न त्याग आंदोलन केले होते , त्यावेळी त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला होता , त्यांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाला २० दिवसांची मुदत दिली होती व हे प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ही दिला होता , त्यासंदर्भात त्यांना राजकीय नेत्यांनी शब्द ही दिला , पण या २० दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे एक ही प्रश्न मार्गी लागला नाही , त्या निषेधार्थ रुपेश ढवण यांनी गुरुवार दि . २० रोजी ग्रामदैवत श्री मळगंगा देवीचे दर्शन घेत आमरण उपोषणाला सुरुवात केली , आज शनिवारी या उपोषणाचा ४ था दिवस असून या कालावधीत पोलीस प्रशासन वगळता , पारनेर तालुका वा नगर जिल्हा पातळीवरील एका ही शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही , वा साधी विचारपूस ही केली नाही . निघोज ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपोषण कर्ते रुपेश ढवण यांची आरोग्य तपासणी केली असता , त्यांचा बी पी वाढला , तर वजन घटले असून थकवा जाणवू लागला आहे . त्यांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे .
राज्यात सत्तेवर असलेल्या सध्याच्या महायुती शासनाने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्ज माफी , कांदा भाव वाढ , कांदा निर्यात खुली करणार , शेती मालाला हमी भाव , या व इतर प्रश्न सोडवण्याचा दिलेला शब्द , सत्तेवर येताच दुर्लक्ष केले . त्यात निसर्गाने गरज नसताना उन्हाळ्यात भरपूर पाऊस दिला . आता पिकांना पावसाची गरज असतानाही पाऊस नाही , पिके सुकून गेली , अक्षरशः पिके करपली आहेत . त्यात कांद्याला भाव नाही , परिणामी बाजार पेठेवर त्याचा फार मोठा परिणाम झाल्याने व्यवसाय ठप्प झाले आहेत , त्यांचा लहान मोठ्या व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे . आर्थिक उलाढाल मंदावली आहे . याला कारणीभूत शासनाचे चुकीचे धोरण ठरले आहे . यामुळे निघोज सारख्या ग्रामीण भागातून रुपेश ढवण सारख्या शेतकरी पुत्राने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आदर्श घेत , अहिंसात्मक मार्गाने आमरण उपोषणाचे हत्यार उपसत हे जनआंदोलन उभे केले आहे . या आंदोलनाच्या उद्या च्या ५ व्या दिवशी पाठिंबा देण्यासाठी जनतेतून उत्सफुर्त प्रतिक्रिया उमटत उद्या रविवार दि . २४ रोजी पारनेर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेले निघोज गाव बंद ठेवत , बस स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर भव्य रस्ता रोको करण्यात येणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here