विरारमधील ४ मजली इमारत कोसळली; १४ राहिवाशांचा मृत्यू

इमारत कोसळली

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । विरार पूर्वेच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीची एक बाजू कोसळली आहे. या चार मजली इमारतीमध्ये बारा कुटुंब राहत होती. त्यापैकी नऊ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

एनडीआरएफच्या ५ व्या बटालियनच्या २ पथकांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या अहवालानुसार आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर १ ज़ख़मी असून दोघाना सुरक्षित बाहेर काढलं आहे. एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत ७ जणांना सुरक्षित बाहेर काढले होते.सध्या ढिगारा हटवण्याचे आणि अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
मात्र ढिगार्‍याखाली आणखी काही नागरिक अडकले असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांकडून डॉग स्कॉड अर्थात प्रशिक्षित श्वान आणले आहेत.दरम्यान स्थानिक आमदार राजन नाईक यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here