योद्धा मनोज जरांगे पाटील – कुबेर जाधव

मनोज जरांगे पाटील

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) । एखादा माणूस इमानदार आणि समाजाशी नाळ घट्ट असेल तर त्याची किती ताकद असते हे आजच्या मनोज जरांगेंच्या आंदोलनातून दिसून येते आहे,जुन्नर शिवनेरीच्या पायथ्याशी जी गर्दी जमलीय, ते पाहून कळते. ३ किलोमीटर चे अंतर पार करण्यासाठी ५ ते ६ तास लागणं यातून जरांगेंच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. अनेकांना वाटलं होतं की,जंरागेचा करिष्मा संपला, आता कसलं आंदोलन आणि कसलं मराठा आरक्षण! एवढी गर्दी जमणार नाही. पण सगळे उघडे पडले.पत्रकारही चक्रावून गेले, आम जनतेच्या मनात काय आहे ?हे जसं मागिल दोन्ही ही निवडणूकीच्या वेळेस सांगता आले नाही, तसंच या, मराठा आंदोलनाच्या वेळीही सांगता आलं नाही.

विधानसभा निवडणुकीत जरांगेंनी लोकांना सांगितलं होतं की, तुम्हाला ज्याला मतदान करावसं वाटतं त्याला मतदान करा, लोकांनी ते तसंच केलं. पण, विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला नाही, असं त्याचं विश्लेषण पत्रकारांनी केले, आणि पुढे जरांगेंच्या मागे लोक जमतील असं वाटत नाही,अशी भावना जोर धरू लागली. पण लोकांनी निवडणुकीत आपल्या मनानुसार काम केलं आणि मनात मात्र मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनाही ह्रदयात कायम ठेवलं
मराठ्यांच्या हृदयात जरांगे प्रंचड आदराने बसले आहेत, हे मुंबई कडे कुच करतांना जमत चाललेल्या व पुढे पुढे वाढत चाललेल्या समाज बांधवांच्या प्रतिसादातून फिल्डवर काम करणारा हर एक पत्रकार सांगेल.मनोज जरांगेंची जादू त्यांच्या मोर्च्याच्या २/३ तास आधीच दिसायला लागते,पत्रकार म्हणून मला जरांगेंचं आंदोलन एक दोन वेळा कव्हर करता आलं. गेल्यावर्षी अंतरवाली तराटीत निघालेल्या मोर्चात जालन्या जवळील साखर कारखान्याच्या शेजारी थंढी वाऱ्याची पर्वा न करता निघालेल्या हजारो महिला उघड्यावर रात्रीच्या मुक्कामासाठी शेतात थांबल्या होत्या त्या महिलांचे उघड्यावर विश्रांती घेत असतानाचे मी प्रकाशित केलेले छायाचित्र प्रचंड प्रमाणात वायरल झाले होते, मागिल वर्षी अंतरवली तराठीत चक्कर मारताना कानोसा घेत सहज एक दोन जाणत्या लोकांना विचारले असता जरांगेंची एवढी क्रेझ का आहे? तर त्यांचं उत्तर होतं, या माणसाला (जरांगेंना) लाखो-कोटींच्या ऑफर आल्या, पण हा समाजासाठी वांरवार जिव धोक्यात घालनारा देवमाणूस मॅनेज झाला नाही.
जरांगेंनाही पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलाखतीत विचारलं की तुमची क्रेझ का आहे? तर जरांगे म्हणाले, मी फुटत नाही. मॅनेज होत नाही, आणि कोणत्याही परिस्थितीत अमिशाला बळी पडत नाही. गेल्यावर्षी अंतरवालीत असताना *एका रात्री अशीच अफवा पसरली की जरांगेंना दिल्लीतील आंदोलनात आण्णा हजारे ला जसै उचलुन नेलं तसं मनोज जरांगेना पोलीस उचलून नेतील. आजुबाजुला लोक त्याची चर्चा करत होते. पुढच्याच तासाभरात हजारो च्या संख्येनं तरुणांचे जत्ते घोषणा देत अंतरवालीत दाखल झाले होते, तेही हातात दांडके घेऊन जरांगेंच्या संरक्षणासाठी सज्ज झाले होते,हि क्रेझ आहे जंरागेच्या आंदोलनाची,.
मनोज जरांगेंचे फोटो तुम्हाला आता गावागावात मराठ्यांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो शेजारी दिसतील. याचं कारण ज्या लाखो मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रं मिळालंय, येवढ्या वर्षे भरात शेकडो मराठ्यांची पोरं कुणी महावितरण, कुणी पोलीस तर कुणी, राज्य सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन सेवेत दाखल होत आहेत, काही उच्च फीमुळे अधुरं राहिलेलं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ लागलंय. हे पाहून इतर मराठ्यांना ही हेवा वाटावा अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे, त्यांना पटु लागलेलं आहे की कुणबीतून आरक्षण मिळालं की पोरांचं शिक्षण होऊ शकतं, त्यांना नोकऱ्या लागू शकतात. कारण सध्या विदर्भ मराठवाड्यातल्या मराठा आणि इतरांचीही अवस्था म्हणजे अल्पभूधारक आणि गरिबीनं त्रासलेली आहे.
मनोज जरांगेंवर मराठ्यांचा विश्वास असण्याचं आणखी एक कारण म्हणजे कुणीतरी समाज बांधव आपल्यासाठी ८-१० दिवस बिगर अन्न पाण्याविना उपाशी राहतंय, यातूनच त्या माणसाची आपल्याबद्दलची तळमळ दिसून येते. खरं तर मराठ्यांना असाच निस्वार्थी माणूस हवा होता, जो मॅनेज होणार नाही.स्वर्गिय आण्णा साहेब पाटील यांच्या नंतर कित्येक दशकांपासून या समाजाला त्याची प्रतीक्षा होती, जी मनोज जरांगेंच्या रुपानं पूर्ण झाली, अशीच तरूण मराठ्यांची भावना आहे. कारण या समाजाने आतापर्यंत सगळ्याच क्षेत्रातले कार्यसम्राट बघितले, पण समाजाचे मात्र हाल होते गेले आणि अशा कार्यसम्राटांच्या पुढच्या पीढ्या अधिकच गब्बर होत गेल्या.

 

नेतृत्व खरे, प्रामाणिक आणि लोकांसाठी लढणारे असेल तर त्यामागे जनतेचा समुद्र कसा उभा राहतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील. गेल्या काही दिवसांपासून “जरांग्यांची जादू संपली” असा प्रचार काही जण जाणीवपूर्वक करत होते. पण आज जे चित्र महाराष्ट्रभर दिसत आहे ते अगदी उलटं आहे. अंतरवाली सराटीतून निघालेल्या जरांगे यांच्या प्रत्येक पावलावर प्रचंड गर्दी उमटते आहे. लोक स्वतःहून पुढे येऊन साथ देत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते – लोकांशी प्रामाणिक राहिलं, न्यायासाठी ठाम उभं राहिलं तर जनता खांद्याला खांदा लावून सोबत करते. मनोज जरांगे यांचा लढा आता मराठा समाजापुरता न राहता, तो संपूर्ण महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाचा आवाज बनत चालला आहे.
– कुबेर जाधव
समन्वयक

सत्ताधाऱ्यांकडे कायदेपंडित आणि काडीलाउ पंडित हे सगळेच असताना तेही आता जरांगेंना थांबवू शकत नाहीत. कारण मनोज जरांगेंच्या ओठात आणि पोटात कपट अजिबात नाही,केवळ आणि केवळ मराठ्यांच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्याची चिंता आणि कळवळा आहे.जरांगे हा माणूस सहजासहजी सत्ताधाऱ्यांच्या हाती लागनार नाही, कारण त्यांच ध्येय आणि उद्दिष्टे गाठण्यासाठी लागनारा अभ्यास तगडा आहे. गेल्यावर्षी अंतरवालीत न्यायाधीश लोक जरांगेंशी चर्चा करत होते, तेव्हा ज्या सफाईनं मनोज जरांगे त्यांना काऊंटर करत होते, ते पाहता जरांगेंचा मराठा आरक्षणाच्या बाबतीत असलेल्या प्रश्नाचा प्रचंड अभ्यास आहे हे स्पष्ट जाणवत होतं.
आपण बारकाईनं पाहिलं तर जरांगेंच्या आंदोलनाला मीडियाचीही फारसी आवश्यकता वाटत नाही ,गावागावात, तालुका तालुक्यात व्हॉट्सअप ग्रूप सक्रिय झालेत,आणि गावातून कोण कोण आंदोलनाला जाणार,? थांबा कुठे घेणार,? वापस कधी येणार? याच सगळं नियोजन त्या त्या ग्रूपवर केलं जातं, आणि मग अत्यंत शिस्तीत आणि नियोजन बद्धतेने पार पाडल जातं.
मनोज जरांगेंना कुणाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आणि कुणाबद्दल राग,व दोष आहे याची मेडियात सातत्यानं चर्चा केली जाते. या आंदोलनामुळे ग्रामिण भागातील लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे, खेड्यापाड्यात मात्र सामाजिक बांधिलकी मात्र अबाधित राखण्यासाठी सर्व घटक प्रयत्नशील राहतील हे मात्र निश्चित, पैसे देऊन गोळा झालेली व भाड्याने आणलेले लोकं आणि स्वयंफूर्तीनं उस्फुर्त पणे आलेले लोक यांतला फरक मनोज जंरागेच्या आंदोलनात चटकन् लक्षात येतो. मनोज जरांगेंने ही माणसं कमावलीय, जेव्हा आणिबाणीचा प्रसंग उभा राहतो तेव्हा एकमुखाने सांगितले जाते, पाटील जसं म्हणतील तसं एवढं प्रेम या माणसांचं जरांगेंवर आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here